जागर - भाग १

posted under by Rakesh Vende
http://jayhind.co.in/reality-of-arvind-kejriwal/ ह्या लेखात प्रस्तुत लेखकाला काय म्हणावयाचे आहे ह्याचा विचार करायला हवा. लेखक प्रामुख्याने दोन महत्वाचे मुद्दे मांडतो. प्रथम लेखक अरविंद केजरीवाल  कार्यरत एन. जी. . संस्थेंला देणगी देण्यारया संस्थेच्या हेतूबद्दल गंभीर आरोप उपस्थित करतात. सार्वजनिक चर्चेत सिद्धता नसलेल्या आरोपांविषयी सखोल व वस्तूनिष्ठ चर्चा करता येत नाहीत, तर काथ्याकूट करता येतो. तो अधिक संभ्रम निर्माण करणारा असतो. अरविंद केजरीवाल  यांनी घेतलेला निधी व त्या निधीचा केलेला खर्च कायदेशीर चौकटीत होता कि नाही हा चर्चेचा मुद्दा असू असतो. तसे असते तर प्रस्तुत लेखकाने कायद्याची कलमे देऊन हा मुद्दा सिद्ध करायला हवा होता. पण लेखक तसे करत नाही. परंतू कुठल्य़ाही पुराव्याशिवाय देणगी देणारया संस्थेंच्या हेतूवर (अनुषंगाने अरविंद केजरिवालावर) गंभिर आरोप उपस्थित करतो. कुण्याच्याही हेतूवर सिद्धता असू शकत नाही, पण त्याच्या शकयाशक्यतेवर निष्फळ चर्चा होवू शकतात. उदाहरण घेवून हा मुद्दा आपण समजून घेवू शकतॊ. उदा. ’आपने दिल्लीत कॉंग्रेसशी हातमिळवणी केली. म्हणुन लगेचच आप कॉंग्रेसधार्जिणे आहे अशी चर्चा करू शकतो. पण प्रत्यक्षात आप सरकार चालवत असताना कॉंग्रेसधार्जिणे निर्णय घेते की सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेते ह्यातच आपची खरी परीक्षा आहे. म्हणूणच कुठल्याही कृतीच्या हेतूच्या प्रामाणिक / अप्रामाणिकतेविषयी शंका घेतल्या जावू शकतात, पण अश्या शंकाना कुठलिही सिद्धता नसते म्हणूण ह्या चर्चा निष्फळ ठरतात. त्या हेतूची खरी सिद्धता ह्या कृतीच्या अंमलबजावणीत असतात. प्रस्तुत लेखकाला जर त्याचे मुद्दे सिद्ध करावयाचे असतील तर अरविंद केजरीवाल  प्रत्यक्ष सरकार चालवत असताना अमेरिकाधार्जिणे निर्णय घेतात का हे पुराव्यानिशी सिद्ध करावे लागेल.

खरं तर दुसरा मुद्दा हाच उपरोक्त लेखाचा मुख्य गाभा आहे. तर तो म्हणजे नरेंद्र मोदी यांना अरविंद केजरीवाल  यांचा असलेला धोका. लेखकाने ह्या मुद्द्यासाठी पहिला मुद्दा हि पार्श्वभूमी म्हणून वापरली, व त्यात अरविंद केजरीवाल  कसे खलनायक आहेत हे पटवून देण्याचा लेखक खटाटोप करताना दिसतॊ.

ह्या निमीत्ताने आपमूळे लोकसभा तसेच विवीध विधानसभा निवडणुकींवर काय परिणाम होतील याची चर्चा आपण करू शकतो. परंतू त्या अगोदर उपरोक्त लेखाच्या शिर्षकाबद्दल थोडा विचार करू. "कैसे बनाया अमेरिका ने आरविंद केजरीवाल को...." हे शिर्षक मला मोठे विचार प्रवर्तक ठरले. ह्यानिमित्ताने काही विशेष विचार करता आले ते असे, कुठलाही नेता कसा मोठा होतो? त्याला कोण मोठं करतं? याचा विचार करायला हवा. ह्या विषयी काही महत्वाचे व तर्कनिष्ठ विचार आचार्य नरहर कुरुंदकर यांनी केलेला दिसतो. ते म्हणतात...

"कोणताही नेता अनुयायांशिवाय नेताच होऊ शकत नाही. नेतृत्व हे अनुयायांच्या मनात असणाऱ्या काही श्रद्धा व प्रेरणा यांच्या पाठिंब्यावर उभे असते. भारत स्वतंत्र झाला पाहिजे, इंग्रजांचे राज्य संपले पाहिजे, ही लक्षावधी भारतीयांच्या मनात असलेली सबळ प्रेरणा असते. या प्रेरणेचे प्रतिनिधी म्हणून जर गांधी-नेहरू उभे राहिले, तर त्यांना लाखो अनुयायी मिळत असतात. ज्या क्षणी ननुयायांच्या मनातील प्रेरणा आणि नेते यांच्यात विसंवाद येतो, त्या क्षणी नवे नेते वर येतात, जुने नेते भाहेर फेकले जातात. गांधी नेहरू या देशाचा स्वातंत्र्य लढा चालवत नसतात, तर लक्षावधी अनुयायांचे नेतृत्व तो लढा चालवत असतात"

हाच विचार आधुनिक काळातील जवळपास सर्वच जनआंदोलनाच्या नेत्यांबाबत करता येतो. आजचिही परिस्थिती निराळी नाही. आज देशातील शहरी-निमशहरी सुशिक्षित मध्यम वर्गाच्या भ्रष्टाचार विरोधी सबळ प्रेरणेचे प्रतिनिधी म्हणून जेव्हा अरविंद केजरीवाल , आण्णा हजारे उभे राहतात, तेव्हा त्यांना लाखो अनुयायी मिळतात व ते एवढ्या मोठ्या जनआंदोलनाचे प्रतिनिधीत्व करू शकतात.

सद्ध्या शहरी-निमशहरी सुशिक्षित मध्यमवर्गियांच्या मनातील प्रबळ प्रेरणांचा निवडणूकिच्या पार्श्वभुमिवर विचार करता येवू शकतो. प्रथम कॉंग्रेस हे भ्रष्ट सरकार आहे असा सर्वसाधारण एक सूर दिसतो पण थोड्याफार फरकानूसार हाच सूर दुसरीकडे भाजपसाठीही आहे असे दिसते. दुसरी सबळ प्रेरणा म्हणजे मनमोहनसिंग प्रणित यूपिए सरकार अकार्यक्षम सरकार होते असा सूर दिसतो तर दुसरीकडे, नरेंद्र मोदी हे मोठे कार्यक्षम नेतृत्व आहे असा सूर दिसतो. ह्या दोहोंचा एकत्रित परिणाम म्हणजे याचा मोठा फायदा भाजपला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि त्यात बरेच तथ्य आहे. तिसरी सबळ प्रेरणा अरविंद केजरीवाल ना मिळत असलेल्या पांठिब्यांतून दिसुन येते, त्या विषयी आपण चर्चा केलेली आहे. तरिही यातून कुठल्याही एका पक्षाला पक्षी भाजपला लोकसभेत बहुमत मिळेल ही समजूत भोळेपणाची आहे.

भ्रष्टाचाराव्यतिरीक्त इतरही अनेक प्रश्न भारतीय जनमानसात गंभिरपणे उभे आहेत. एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर अनेक स्थानिक प्रश्न अतिशय गंभिर आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, स्थानिक आदिवासींचे प्रश्न.. एक वा अनेक. मनसे ला एक संधी मिळाली होती, महाराष्ट्रातल्या खेडोपाडी जाउन, तेथील स्थानिक प्रश्न समजून घ्यायला हवे होते. पुढच्या लोकसभा किंवा येत्या विधानसभेच्या पार्श्वभूमिवर, जर आपला आपली पाणेमूळे पसरावयाची असतील तर स्थानिकांचे प्रश्न समजून घेवून त्यांना प्रतिसाद देणे महत्वाचे आहे. त्यासाठी लागणारी मोठी संघटना व असे अनेक आव्हानांना आपला सामोरे जावे लागणार आहे.

कॉंग्रेसचा सद्ध्याच्या राजनिणितीचा विचार केला तर तो सरळ आहे. नरेंद्र मोदिंविषयी जो सकारात्मक सूर लागतो आहे, तो कमी करण्यासाठी त्यांना अरविंद केजेरिवालांशिवाय पर्याय नाही. निदान सर्व निवडणूका पार पडेस्तोव तरी त्यांना आपला पाठिंबा द्यावा लागणार आहे. पण हे तंत्र कॉंग्रेससाठी दुधारी तलवार ठरू शकते.

पण मूळात ह्या सर्व गदारोळात काही चांगले होत आहे का याचा विचार करायला हवा. स्वातंत्र्योत्तर काळात
काही घातक मूल्ये समाजात रुढ होवू पहात आहेत. पैकी, लोकशाही असूनही सामान्य माणूस हा दुबळा आहे, लाचार आहे, त्याचा हाती काहिही नाही असा समज सर्वसामान्यपणे पसरलेला दिसतो. हा समज म्हणजे भारतीय समाजाचं नैराश्याचं संकेत आहे. लोकशाही असूनही सामान्य जनता स्वःला दूबळी समजते व आपण काही करू शकत नाही हा समज अतिशय घातक आहे. तरिही आण्णांच्या चळवळींतून व आपच्या यशाने हा समज चूकिचा आहे हे दाखवून दिले आहे. सामान्य माणुस जर संघटीत झाला तर सामाजिक परिवर्तन घडवून आणू शकतो हे आदर्श तत्व किंवा आदर्श गोष्ट नसून व्यावहारिक सत्य आहे ह्यावर आमचा विश्वास बसतो आहे हे मोठे आशादायी चित्र आहे.


आणि ह्याच मुद्द्यांच्या अनुषंगाने अरविंद केजेरिवालांने घेतलेल्या निर्णायांचा विचार करता येतो. अरविंद केजरीवाल  म्हणतात, सरकारी गाडी, बंगला नको, व्ही. आय. पी. कल्चर चालू देणार नाही, सुरक्षा व्यवस्था घेणार नाहीत. हे सर्व निर्णय प्रतिकात्मक आहेत. त्यांना असे म्हणावयाचे असते कि, मी मंत्री असलॊ तरी, सर्वसामान्याचा सेवेसाठी असणारा सर्वसामान्य कार्यकारी मंत्री आहे. नेते हे जनतेचे मालक नसून, नेते हे जनतेच्या सेवेसाठी आहेत, असे सूचित करण्याचा प्रयत्न असतो. जे नैतिक दडपण आतापर्यंत नेतेमडळी आपल्या वागणूकितून सामान्यांवर टाकत होते, ते नाहिसे करण्याचा प्रयत्न ह्या प्रतिकात्मक निर्णयांतून होताना दिसते.


ही व अशीच नवी मुल्ये रुजवण्याचे व जूनी धोकादायक मुल्ये मूळासकट उपटण्याचे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. ही एक नव्या पहाटेची सुरुवात आहे असे मला वाटते, ह्या आशादायक नवकिरणांचे मी दोंही बाहू पसरून स्वागत करतो.6 comments

Make A Comment

6 comments:

yashwant raut said...

eakadam mast .....

Deepak Parkhe said...

Absolutely... Now it's up to AAP to do good work and keep the hope alive... I have sent an email to AAP asking their views on this..waiting for reply.

Mahen D Joshi said...

Agadi sahamat aahe me tujhya matashi....

Swapnil Patil said...

abe Article madhe kay lihile ani tyne proof ka nahi dile he ka v4to ahe tu ?
Main mhanje AK ha Congress cha ek khel ahe :)

Rakesh Vende said...

@Deepak: Please send the details of mail that you mentioned.
@Swapnil: Jar AK ha Congress cha ek khel asel tar mag je hazaro lok AK la support karatat te congress che aahet kay ;-) Jokes apart, this can be seriously discussed. Please tell us more what led you to conclude that AK is nothing but a political game of Congress.

Swapnil Patil said...

@ Deepak , I already sent mail to AAP and also sent messages to AK on Facebook but haven't got any reply :(

@Rakesh : please go through Deepaks facebook link and you will get all information

Post a Comment

top