बालविश्व

posted under by Rakesh Vende

"अरे, आपली छकुली शाळेत टिळकांवर भाषण देणार आहे" ! असे माझ्या आइने मला कळवल्यानंतर माझ्या आनंदाला काही उधान राहीले नाही. हर्ष उल्लासासोबत जरा आश्चर्यपण वाट्ले. छकुली म्हणजे माझी भाची; ही सहा वर्षाची लहानगी छकुली चक्क इंग्रजीत भाषण वैगरे करणार म्हणजे काय नवलच. त्यानंतर आइने असेही सांगितले की, छकुलीने त्यांना फोनवर ते भाषण बोलुन सुद्धा दाखवले. मग काय मी सुद्धा तिला लगेच फोन केला व तिचे भाषण एकले. तिचा उत्साह अवर्णनीय होता. मधे एक दोन वेळा ती (आठवत नव्हते म्हणुन) अडखळली खरी. पण तिचे शब्दोच्चार अतिशय स्पष्ट होते. ते सर्व एकतांना मनात सुखद अनुभूतीच्या लहरी उमटत होत्या. आनंद आनंद काय म्हणतात ते हेच असते असे मला त्या क्षणो-क्षणी जाणवत होते. व्वा! मी मनातल्या मनात म्हंटले.असेच तिला; तिचे काका, व माझे आइ-वडिल, भाउ यांनी सर्वांनी फोन करुन हा आनंद लुटला व अप्रत्यक्षपणे भाषणापुर्वी तिची बरीच तयारी झाली.

नंतर प्रत्यक्षात तिचे भाषण खूप सुंदर झाले असे कळले. तिला अभिनंदन देण्यासाठी परत फोन करतो तर तिने तेच भाषण मला परत एकवले :) ह्या वेळेस मात्र ती अजिबात अडखळली नाही. शिवाय "मला ख्खुप मज्जा आली, मी पुढच्या वर्षी सुद्धा भाषण देणार", असे ती मोठ्या आनंदाने सांगत होती. एकंदरीत भाषण देण्यासाठी केलेली तयारी, आम्हाला परत-परत भाषण एकवण्याची तिची हौस, प्रत्यक्ष व्यासपीठावर भाषण करण्याची मिळालेली संधी ह्या सर्व गोष्टी तिने खुप एन्जॉय केल्या होत्या.

नंतर दुसऱ्या दिवशी, स्टार माझा ह्या वृत्त वाहिनीवर ‘बालविश्व’ (?) ह्या सदरात ‘लहान मुलांनी निंबध किंवा पत्रलेखन कसे करावे’ ह्या विषयावर एक चांगला(!) कार्यक्रम पहावयास मिळाला. त्यात प्रस्तुत व्यक्तिने काही छान मुद्दे मांडत शिक्षक लोक कसे, लहान मुलांना निबंध लिहीतांना अश्या काही पध्दतीचा अवलंब करतात की त्यांचाकडुन कृत्रिम वाटावे असे लेखन करवून घेतात. हाच मुद्दा पटवून देतांना ते काही दाखलेही देतात ‘नटली ही धरणीमाता. हिरवा शालू नेसून..’ किंवा ‘नेहमिच येतो मग पावसाळा’ अश्या काही गोष्टी लिहायला लावतात. खरं म्हणजे ह्यातून त्यांचा खऱ्या कल्पनाशक्तीला वाव मिळतच नाही असेही ते म्हणतात. ते जर स्वानुभूतीतून लिहायला शिकले तरच त्यांना लिहिण्याची (अर्थात शिकण्याची) प्रेरणा मिळेल नाहीतर ह्या सर्व गोष्टींचा मुलाना नंतर कंटाळा येतो परिणामी त्यांची अभ्यासातली रूची कमी होते.

पत्रलेखनाबाबतितही त्यांनी केलेली टिप्पणी मार्मिक होती. ते म्हणतात बालवयात त्यांनी परिक्षेखेरीज कुठेही/कधीही पत्रलेखन केले नाही. म्हणजेच भरपुर मुले लहानपणी कुणाशी असा पत्रव्यवहार करतच नाहीत तर मग मुलांना पत्रलेखनाबद्द्ल आवड निर्माण होइलच कशी? त्यांच्या म्हणण्यात तथ्य होतं. त्यांनी मांडलेले सर्व मुद्दे पटतात. तर सांगण्याचा मुद्दा असा की ‘स्वानुभूतितूनच’ मुले शिकतात, असे त्यांचा एकुण म्हणण्याचा अभिप्राय असावा असे वाटले. मग ‘स्वानुभूतितून’ मुलांना शिकवावे कसे ह्यासाठी माझ्या डोक्यात भन्नाट कल्पना आली. मी आमच्या छकुलीला पत्र लिहिणार व तिलाही पत्र लिहायला लावणार. ती इंग्रजी माध्यमात शिकत असल्याने तिला एक पत्र मराठीतून तर एक इंग्रजीतून लिहीणार व तसेच तिलाही लिहायला लावणार म्हणजे दोघं भाषांची तिची तयारी होइल.

आता मी छकुलीला पाठवलेलं पत्र व छकुलीने मला पाठविलेलं पहिलं पत्र आपल्या ब्लॉगवर येणार हे सांगणे नलगे:)

1 comments

Make A Comment

1 comment:

Mahen D Joshi said...

छकुलीचे पत्र कधी ब्लॉगवर येणार.....आम्ही वाट पाहत आहोत....त्याच्या जोडीस तुमचेही पत्र असावे...तर..अजुन चांगले अनुभव वाचण्यास येतील...

Post a Comment

top