तोरणा ट्रेक: एक सुखद अनुभव

posted under , by Rakesh Vende
कसलीतरी चाहूल एकायला येत होती पण थंड वाऱ्याची झुळूक; उबदार पांघरुण; डोळ्यांच्या पापण्या घट्ट रुतलेल्या, मला सुखकारी निद्रावस्थेतून बाहेर येवू देत नव्हते. पण सुरवातीची चाहुल नंतर वाढत गेलेली ती कुजबूज आता मला स्पष्ट एकायला येत होती. ‘सुख देतील ते मित्र कुठले’ या उक्तिप्रमाणे शेवटी त्यांनी मला उठवलेच. आणि मि हि भानावर आलो. आज आपल्याला ट्रेकसाठी जायचे आहे असे स्पष्ट आठवायला लागले.

अमोल व संदेश मंडळी आदल्या रात्रिच पोहोचली होती. मुंबइची बाकिची पब्लिक मुंबइत होत असलेल्या पावसामुळे येवू शकली नाहीत आणि ते एका सुंदर अनुभवाला मुकणार हे आम्हाला तिथेच कळून चुकले. परंतु न आलेल्या मंडळीमुळे बाईक्स अपुर्ण पडत होत्या व ट्रेक रद्द होतो कि काय अशी भिती वाटत असतांनाच गजनीक्रूपेने आम्हाला एक बाईक मिळाली व आमचा पुढचा मार्ग सुकर झाला. :)

पहिला स्टॉप ‘कल्याणि वेज’ जिथे भाउ उर्फ ‘गजनी’आम्हाला भेटणार होता. पुढचा स्टॉप स्वारगेट तिथे आम्ही परसिस्टंट्च्या’ पब्लिकला सोबत घेणार होतो. स्वारगेटहून पुढे कात्रज मार्गे बोगदा मार्ग संपल्यानंतर आम्ही अल्पोहारासाठी थांबलो. गरम-गरम पोह्यांवर ताव मारला. आर्थिक व्यवहाराचा सर्व भार अमितने आपल्या खांद्यावर घेतला आणि आम्ही मज्जा करायला मोकेळे झालो.

एव्हाना आमच्यात पुर्ण एनर्जी आलेली होती. ग्रुप तयार होतांना दिसत होता. स्वप्नीलने सर्वांची खेचायची सुरुवात केली होती. अमित व संदेशचे टिपीकल जोक्स सुरु झाले होते. आणि नोट टू मेंशन; फोटोसेशनेही गती पकडली होती.

सकाळची वेळ असल्याने महामार्ग तसा मोकळाच पडला होता. अर्थातच २२० सी सी भन्नाट वेगाने पळवण्याची संधी मि गमावणार नव्हतोच. मि, माझ्यामागे संदेश आम्ही दोघे मिळून ताशी १०२ कि.मी. वेगाने वाऱ्याशी स्पर्धा करु लागलो. इट वाझ थ्रिल !

नसरापूर फाट्याला वेल्हा गावाकडे (जिथे तोरणा गड वसतो) जाणारा रस्ता आहे, तिथे आम्ही सर्वांची वाट पहात थांबलो होतो. तिथे सर्व जण परत भेटल्यावर पुढचा प्रवास साधा रस्ता असल्याकारणाने हळुहळु झाला. माझी बाइक अमित चालवत असल्याने मि आपला मनमुराद गाव-परिसरातील स्रूष्टी-सौंदर्य न्याहळत होतो.
वेल्हा गावावर पोहोचल्यावर तिथे पोलिस कार्यालय, ‘सभापती कार्यालय’दर्शक पाटी असलेली कुलुप लावलेली खोली, व सिंमेट-कॉक्रिट्चे घर वजा होटेल एवढचं काय गावाचे स्वरुप दिसले. त्याच परिसरात बाइक्स पार्क केल्या. जसं जसं पुढे सरकत गेलो, तसा गावाचा ओघ द्रुष्टिपथास पडत गेला. एक विहिर दिसली. स्वच्छ पाण्याने तुंडंब भरलेली. गावची लोकं तिथे पाणि भरताना दिसली. स्रिया कपडे धुतांना तर लहान मुले सुरवातिला नको नको म्हणत नंतर आंघोळीचा आनंद घेतांना दिसत होती. बैल गाडी दिसली; चिखलेने भरलेला रस्ता दिसला. क्षणभर वाटले मि आमच्याच गावात फिरत आहे कि काय. पावसाळ्याच्या दिवसात सकाळच्या वातावरणात गावात असलेली प्रसन्नता स्पष्ट जाणवत होती. मन प्रसन्न झाले होते. आता ओढ होती ति गड सर करायची.

पुढे जात असलेल्या पर्यटकांच्या व गावकऱ्यांच्या मदतीने आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. राधेश्यामला पढे चालवत नसल्याने त्याने तिथेच माघार घेतली व तो पायथ्यापाशीच थांबला. आम्ही मात्र गडाच्या उत्तुंग शिखराकडे बघत मार्गक्रमण करायला सुरुवात केली. गड प्रचंड सुरेख दिसत होता. धुक्याच्या पडद्यात त्याचे सौंदर्य खुलत होतो. ढग गडाला स्पर्श करुन जात असतांना त्यांचा हेवा वाटत होता. इकडे पावासाने आपले काम जोरात चालु केले होते. लाल माती ओली झाल्याने निसटायला होत होतं.आम्ही तसे हसत खेळत एक-दोन पॅच पुर्ण केले होते. मधे थोडा विसावा घेण्यासाठी आम्ही थांबलॊ. तिथे आम्हाला दोन लहान बहिणींनी (मच निडेड) लिंबु-पाणी पाजवले.आमची बाटली रिकामी झाल्याने आम्ही त्याचाकडुन बाटलीभर पाण्याची मागणी केली व त्यांनी पाणी देण्यास लगेच होकार दिला. मि क्षणभर विचार केला कि पाणी हेच त्यांच्या व्यवसायाचे मुख्य आधार आहे. शरिरावर पाण्याचे ओझे बाळगत ते एवढ्या उंचावर येतात. पाणी संपला कि व्यवसाय बंद किंवा परत एवढ्या खाली जावुन पाणी आणणे म्हणजे किति कष्टाचे काम. तरिही किती सहजपणाने ते आम्हाला पाणी (फुकट) देण्यास तयार झाले होते. मि आपला प्रोफ़ेशनल मनाने विचार करु लागलो. असो, आम्ही ह्या गोष्टीचा विचार करुन त्यांचाकडुन पाणी न घेता बाटलीभर लिंबु-पाणिच घेतले :)


आता परत पुढचा पॅच सर करण्यासाठी आम्ही पढे सरावलॊ. थोड्याश्या विसाव्याने मन जरी फ्रेश झाली होतं तरी, पाय मात्र आता जड वाटू लागले. बॅग्ज पकडण्यावरुन संदेश, स्वप्निल याच्यात (नेहमीप्रमाणे) वाद चालु झाले. त्यातच हा पॅच देखिल आम्ही सर केला होता. आता मात्र सपाट पठार लागले होते. ह्याठिकाणी थोडं का होइना ऍचिवमेंट्चे फिलिंग यायला लागले होते. सर्वत्र धुकं दिसत होतं. खाली अंधुक-अंधुक गावं दिसत होती. आणि फोटो काढण्यासाठी हे लोकेशन आम्हाला परफेक्ट वाट्लं व आम्ही मनमुराद फोटॊ काढले.

पण ह्या पुढचा पॅच प्रचंड कठीण वाटत होता. स्लोप अतिशय कमी होता म्हणजे सरळ चढच होता तो. ओले झालेल्या निसटत्या दगडांच्या लहान लहान कडा हाच फक्त वरती चढण्याचा आधार. ह्या ठिकाणि आम्हाला थोडी भिती वाटली. पण प्रत्येकाने त्या कडांचा व्यवस्थित अदांज घेत तो पॅच पार केला. पुढे मात्र चढण्यासाठी वाटेच्या वाजुला लोखंडी पाईप्स आधार म्हणून लावले होते त्यामुळे पुढचा प्रवास तेवढा कठीण वाटला नाही.मधेच अमोलने एक व्यवस्थित, घट्ट दिसत असलेला; आधारासाठी लावलेला लोखंडी पाइप, तुटलेला आहे व् तो खोच्यात व्यवस्थित बसलेला नाही हे लक्षात आणुन दिले. गड चढण्यासाठी असलेल्या वाटेला व्यवस्थापणाची किती गरज आहे ह्या गोष्टीची जाणिव झाली. ह्या सर्व बाबींची दखल घेत आम्ही मार्गक्रमण केले आणि एकदाचे आम्ही गडावर पोहोचलो.

गडावर पोहोचल्या-पोहोचल्या आम्ही तडक एका झोपडीत शिरलो, जिथे आम्हाला बाकी मडंळी चहा पोह्यांचा आस्वाद घेतांना दिसत होते. मस्त चहा-पोहे फस्त केले. पण बसल्या-बसल्या तिथे चांगलीच थंडी वाजायाला लागली;अंगात हुडहुडी भरली. आता परत पावसात भिजण्याची हिंम्मत होत नव्हती. परंतु जायला उशिर होइल म्हणुन आम्ही लवकर लवकर गड फिरुन निघायचे ठरवले.

पावसाच्या जोरदार सरी, प्रचंड वेगाने सुसाट वाहणारी हवा नव्हे वादळ; स्वत:चा तोल कधिही जाउ शकतो; ह्या धडपडीत गडावरचं स्रूष्टी-सौंदर्य अनुभवयाची मजा काही औरच ! गडावर फिरत-फिरत आम्ही झुंजार माची दिसते त्या कडेला आलो. ति हिरवी गार माची अतिशय सुंदर दिसत होती. तिचा फोटॊ घ्यावा म्हणुन कॅमेरा काढला आणि धुक्यांचे पांघरुन घेवून तिने स्वत:ला झाकून घेतेले. आम्ही सर्व जण झुंजार माची परत स्पष्ट बघण्यासाठी थोडा वेळ माचीकडे एकटक बघत तिथेच थांबलॊ. निसर्गाचे ते अतिव सौंदर्य डोळ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करु लागलो. आता मात्र त्या ढगांचा हेवा मला वाटत नव्हता.

निघतांना मात्र प्रवास अतिशय सोपा वाटला. पाउस थांबला होता. ढग नाहिशी होउन सुर्याने आता स्रूष्टीचा ताबा मिळवला होता. मनात साठलेल्या सुखद, गार आठवणी घेउन आम्ही परतिचा प्रवास करत होतो.

0 comments

Make A Comment

No comments:

Post a Comment

top