Age of Excess

posted under by Rakesh Vende
We are living in the world of excess. Look around you, things are growing in size & magnitude & in expectations. The irony is 'Need' is created to match to these expectations; a so-called progress. Our expectations are rising & we are killing our self to meet to these expectations. Marriages are no-longer meant to love, life is no longer meant to live; in this way, they fall short in this 'larger than life world'. I happened to read this thoughtful article in Times of India by a Pritish Nandy. Must Read, highly recommended !

बालविश्व

posted under by Rakesh Vende

"अरे, आपली छकुली शाळेत टिळकांवर भाषण देणार आहे" ! असे माझ्या आइने मला कळवल्यानंतर माझ्या आनंदाला काही उधान राहीले नाही. हर्ष उल्लासासोबत जरा आश्चर्यपण वाट्ले. छकुली म्हणजे माझी भाची; ही सहा वर्षाची लहानगी छकुली चक्क इंग्रजीत भाषण वैगरे करणार म्हणजे काय नवलच. त्यानंतर आइने असेही सांगितले की, छकुलीने त्यांना फोनवर ते भाषण बोलुन सुद्धा दाखवले. मग काय मी सुद्धा तिला लगेच फोन केला व तिचे भाषण एकले. तिचा उत्साह अवर्णनीय होता. मधे एक दोन वेळा ती (आठवत नव्हते म्हणुन) अडखळली खरी. पण तिचे शब्दोच्चार अतिशय स्पष्ट होते. ते सर्व एकतांना मनात सुखद अनुभूतीच्या लहरी उमटत होत्या. आनंद आनंद काय म्हणतात ते हेच असते असे मला त्या क्षणो-क्षणी जाणवत होते. व्वा! मी मनातल्या मनात म्हंटले.असेच तिला; तिचे काका, व माझे आइ-वडिल, भाउ यांनी सर्वांनी फोन करुन हा आनंद लुटला व अप्रत्यक्षपणे भाषणापुर्वी तिची बरीच तयारी झाली.

नंतर प्रत्यक्षात तिचे भाषण खूप सुंदर झाले असे कळले. तिला अभिनंदन देण्यासाठी परत फोन करतो तर तिने तेच भाषण मला परत एकवले :) ह्या वेळेस मात्र ती अजिबात अडखळली नाही. शिवाय "मला ख्खुप मज्जा आली, मी पुढच्या वर्षी सुद्धा भाषण देणार", असे ती मोठ्या आनंदाने सांगत होती. एकंदरीत भाषण देण्यासाठी केलेली तयारी, आम्हाला परत-परत भाषण एकवण्याची तिची हौस, प्रत्यक्ष व्यासपीठावर भाषण करण्याची मिळालेली संधी ह्या सर्व गोष्टी तिने खुप एन्जॉय केल्या होत्या.

नंतर दुसऱ्या दिवशी, स्टार माझा ह्या वृत्त वाहिनीवर ‘बालविश्व’ (?) ह्या सदरात ‘लहान मुलांनी निंबध किंवा पत्रलेखन कसे करावे’ ह्या विषयावर एक चांगला(!) कार्यक्रम पहावयास मिळाला. त्यात प्रस्तुत व्यक्तिने काही छान मुद्दे मांडत शिक्षक लोक कसे, लहान मुलांना निबंध लिहीतांना अश्या काही पध्दतीचा अवलंब करतात की त्यांचाकडुन कृत्रिम वाटावे असे लेखन करवून घेतात. हाच मुद्दा पटवून देतांना ते काही दाखलेही देतात ‘नटली ही धरणीमाता. हिरवा शालू नेसून..’ किंवा ‘नेहमिच येतो मग पावसाळा’ अश्या काही गोष्टी लिहायला लावतात. खरं म्हणजे ह्यातून त्यांचा खऱ्या कल्पनाशक्तीला वाव मिळतच नाही असेही ते म्हणतात. ते जर स्वानुभूतीतून लिहायला शिकले तरच त्यांना लिहिण्याची (अर्थात शिकण्याची) प्रेरणा मिळेल नाहीतर ह्या सर्व गोष्टींचा मुलाना नंतर कंटाळा येतो परिणामी त्यांची अभ्यासातली रूची कमी होते.

पत्रलेखनाबाबतितही त्यांनी केलेली टिप्पणी मार्मिक होती. ते म्हणतात बालवयात त्यांनी परिक्षेखेरीज कुठेही/कधीही पत्रलेखन केले नाही. म्हणजेच भरपुर मुले लहानपणी कुणाशी असा पत्रव्यवहार करतच नाहीत तर मग मुलांना पत्रलेखनाबद्द्ल आवड निर्माण होइलच कशी? त्यांच्या म्हणण्यात तथ्य होतं. त्यांनी मांडलेले सर्व मुद्दे पटतात. तर सांगण्याचा मुद्दा असा की ‘स्वानुभूतितूनच’ मुले शिकतात, असे त्यांचा एकुण म्हणण्याचा अभिप्राय असावा असे वाटले. मग ‘स्वानुभूतितून’ मुलांना शिकवावे कसे ह्यासाठी माझ्या डोक्यात भन्नाट कल्पना आली. मी आमच्या छकुलीला पत्र लिहिणार व तिलाही पत्र लिहायला लावणार. ती इंग्रजी माध्यमात शिकत असल्याने तिला एक पत्र मराठीतून तर एक इंग्रजीतून लिहीणार व तसेच तिलाही लिहायला लावणार म्हणजे दोघं भाषांची तिची तयारी होइल.

आता मी छकुलीला पाठवलेलं पत्र व छकुलीने मला पाठविलेलं पहिलं पत्र आपल्या ब्लॉगवर येणार हे सांगणे नलगे:)

तोरणा ट्रेक: एक सुखद अनुभव

posted under , by Rakesh Vende
कसलीतरी चाहूल एकायला येत होती पण थंड वाऱ्याची झुळूक; उबदार पांघरुण; डोळ्यांच्या पापण्या घट्ट रुतलेल्या, मला सुखकारी निद्रावस्थेतून बाहेर येवू देत नव्हते. पण सुरवातीची चाहुल नंतर वाढत गेलेली ती कुजबूज आता मला स्पष्ट एकायला येत होती. ‘सुख देतील ते मित्र कुठले’ या उक्तिप्रमाणे शेवटी त्यांनी मला उठवलेच. आणि मि हि भानावर आलो. आज आपल्याला ट्रेकसाठी जायचे आहे असे स्पष्ट आठवायला लागले.

अमोल व संदेश मंडळी आदल्या रात्रिच पोहोचली होती. मुंबइची बाकिची पब्लिक मुंबइत होत असलेल्या पावसामुळे येवू शकली नाहीत आणि ते एका सुंदर अनुभवाला मुकणार हे आम्हाला तिथेच कळून चुकले. परंतु न आलेल्या मंडळीमुळे बाईक्स अपुर्ण पडत होत्या व ट्रेक रद्द होतो कि काय अशी भिती वाटत असतांनाच गजनीक्रूपेने आम्हाला एक बाईक मिळाली व आमचा पुढचा मार्ग सुकर झाला. :)

पहिला स्टॉप ‘कल्याणि वेज’ जिथे भाउ उर्फ ‘गजनी’आम्हाला भेटणार होता. पुढचा स्टॉप स्वारगेट तिथे आम्ही परसिस्टंट्च्या’ पब्लिकला सोबत घेणार होतो. स्वारगेटहून पुढे कात्रज मार्गे बोगदा मार्ग संपल्यानंतर आम्ही अल्पोहारासाठी थांबलो. गरम-गरम पोह्यांवर ताव मारला. आर्थिक व्यवहाराचा सर्व भार अमितने आपल्या खांद्यावर घेतला आणि आम्ही मज्जा करायला मोकेळे झालो.

एव्हाना आमच्यात पुर्ण एनर्जी आलेली होती. ग्रुप तयार होतांना दिसत होता. स्वप्नीलने सर्वांची खेचायची सुरुवात केली होती. अमित व संदेशचे टिपीकल जोक्स सुरु झाले होते. आणि नोट टू मेंशन; फोटोसेशनेही गती पकडली होती.

सकाळची वेळ असल्याने महामार्ग तसा मोकळाच पडला होता. अर्थातच २२० सी सी भन्नाट वेगाने पळवण्याची संधी मि गमावणार नव्हतोच. मि, माझ्यामागे संदेश आम्ही दोघे मिळून ताशी १०२ कि.मी. वेगाने वाऱ्याशी स्पर्धा करु लागलो. इट वाझ थ्रिल !

नसरापूर फाट्याला वेल्हा गावाकडे (जिथे तोरणा गड वसतो) जाणारा रस्ता आहे, तिथे आम्ही सर्वांची वाट पहात थांबलो होतो. तिथे सर्व जण परत भेटल्यावर पुढचा प्रवास साधा रस्ता असल्याकारणाने हळुहळु झाला. माझी बाइक अमित चालवत असल्याने मि आपला मनमुराद गाव-परिसरातील स्रूष्टी-सौंदर्य न्याहळत होतो.
वेल्हा गावावर पोहोचल्यावर तिथे पोलिस कार्यालय, ‘सभापती कार्यालय’दर्शक पाटी असलेली कुलुप लावलेली खोली, व सिंमेट-कॉक्रिट्चे घर वजा होटेल एवढचं काय गावाचे स्वरुप दिसले. त्याच परिसरात बाइक्स पार्क केल्या. जसं जसं पुढे सरकत गेलो, तसा गावाचा ओघ द्रुष्टिपथास पडत गेला. एक विहिर दिसली. स्वच्छ पाण्याने तुंडंब भरलेली. गावची लोकं तिथे पाणि भरताना दिसली. स्रिया कपडे धुतांना तर लहान मुले सुरवातिला नको नको म्हणत नंतर आंघोळीचा आनंद घेतांना दिसत होती. बैल गाडी दिसली; चिखलेने भरलेला रस्ता दिसला. क्षणभर वाटले मि आमच्याच गावात फिरत आहे कि काय. पावसाळ्याच्या दिवसात सकाळच्या वातावरणात गावात असलेली प्रसन्नता स्पष्ट जाणवत होती. मन प्रसन्न झाले होते. आता ओढ होती ति गड सर करायची.

पुढे जात असलेल्या पर्यटकांच्या व गावकऱ्यांच्या मदतीने आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. राधेश्यामला पढे चालवत नसल्याने त्याने तिथेच माघार घेतली व तो पायथ्यापाशीच थांबला. आम्ही मात्र गडाच्या उत्तुंग शिखराकडे बघत मार्गक्रमण करायला सुरुवात केली. गड प्रचंड सुरेख दिसत होता. धुक्याच्या पडद्यात त्याचे सौंदर्य खुलत होतो. ढग गडाला स्पर्श करुन जात असतांना त्यांचा हेवा वाटत होता. इकडे पावासाने आपले काम जोरात चालु केले होते. लाल माती ओली झाल्याने निसटायला होत होतं.आम्ही तसे हसत खेळत एक-दोन पॅच पुर्ण केले होते. मधे थोडा विसावा घेण्यासाठी आम्ही थांबलॊ. तिथे आम्हाला दोन लहान बहिणींनी (मच निडेड) लिंबु-पाणी पाजवले.आमची बाटली रिकामी झाल्याने आम्ही त्याचाकडुन बाटलीभर पाण्याची मागणी केली व त्यांनी पाणी देण्यास लगेच होकार दिला. मि क्षणभर विचार केला कि पाणी हेच त्यांच्या व्यवसायाचे मुख्य आधार आहे. शरिरावर पाण्याचे ओझे बाळगत ते एवढ्या उंचावर येतात. पाणी संपला कि व्यवसाय बंद किंवा परत एवढ्या खाली जावुन पाणी आणणे म्हणजे किति कष्टाचे काम. तरिही किती सहजपणाने ते आम्हाला पाणी (फुकट) देण्यास तयार झाले होते. मि आपला प्रोफ़ेशनल मनाने विचार करु लागलो. असो, आम्ही ह्या गोष्टीचा विचार करुन त्यांचाकडुन पाणी न घेता बाटलीभर लिंबु-पाणिच घेतले :)


आता परत पुढचा पॅच सर करण्यासाठी आम्ही पढे सरावलॊ. थोड्याश्या विसाव्याने मन जरी फ्रेश झाली होतं तरी, पाय मात्र आता जड वाटू लागले. बॅग्ज पकडण्यावरुन संदेश, स्वप्निल याच्यात (नेहमीप्रमाणे) वाद चालु झाले. त्यातच हा पॅच देखिल आम्ही सर केला होता. आता मात्र सपाट पठार लागले होते. ह्याठिकाणी थोडं का होइना ऍचिवमेंट्चे फिलिंग यायला लागले होते. सर्वत्र धुकं दिसत होतं. खाली अंधुक-अंधुक गावं दिसत होती. आणि फोटो काढण्यासाठी हे लोकेशन आम्हाला परफेक्ट वाट्लं व आम्ही मनमुराद फोटॊ काढले.

पण ह्या पुढचा पॅच प्रचंड कठीण वाटत होता. स्लोप अतिशय कमी होता म्हणजे सरळ चढच होता तो. ओले झालेल्या निसटत्या दगडांच्या लहान लहान कडा हाच फक्त वरती चढण्याचा आधार. ह्या ठिकाणि आम्हाला थोडी भिती वाटली. पण प्रत्येकाने त्या कडांचा व्यवस्थित अदांज घेत तो पॅच पार केला. पुढे मात्र चढण्यासाठी वाटेच्या वाजुला लोखंडी पाईप्स आधार म्हणून लावले होते त्यामुळे पुढचा प्रवास तेवढा कठीण वाटला नाही.मधेच अमोलने एक व्यवस्थित, घट्ट दिसत असलेला; आधारासाठी लावलेला लोखंडी पाइप, तुटलेला आहे व् तो खोच्यात व्यवस्थित बसलेला नाही हे लक्षात आणुन दिले. गड चढण्यासाठी असलेल्या वाटेला व्यवस्थापणाची किती गरज आहे ह्या गोष्टीची जाणिव झाली. ह्या सर्व बाबींची दखल घेत आम्ही मार्गक्रमण केले आणि एकदाचे आम्ही गडावर पोहोचलो.

गडावर पोहोचल्या-पोहोचल्या आम्ही तडक एका झोपडीत शिरलो, जिथे आम्हाला बाकी मडंळी चहा पोह्यांचा आस्वाद घेतांना दिसत होते. मस्त चहा-पोहे फस्त केले. पण बसल्या-बसल्या तिथे चांगलीच थंडी वाजायाला लागली;अंगात हुडहुडी भरली. आता परत पावसात भिजण्याची हिंम्मत होत नव्हती. परंतु जायला उशिर होइल म्हणुन आम्ही लवकर लवकर गड फिरुन निघायचे ठरवले.

पावसाच्या जोरदार सरी, प्रचंड वेगाने सुसाट वाहणारी हवा नव्हे वादळ; स्वत:चा तोल कधिही जाउ शकतो; ह्या धडपडीत गडावरचं स्रूष्टी-सौंदर्य अनुभवयाची मजा काही औरच ! गडावर फिरत-फिरत आम्ही झुंजार माची दिसते त्या कडेला आलो. ति हिरवी गार माची अतिशय सुंदर दिसत होती. तिचा फोटॊ घ्यावा म्हणुन कॅमेरा काढला आणि धुक्यांचे पांघरुन घेवून तिने स्वत:ला झाकून घेतेले. आम्ही सर्व जण झुंजार माची परत स्पष्ट बघण्यासाठी थोडा वेळ माचीकडे एकटक बघत तिथेच थांबलॊ. निसर्गाचे ते अतिव सौंदर्य डोळ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करु लागलो. आता मात्र त्या ढगांचा हेवा मला वाटत नव्हता.

निघतांना मात्र प्रवास अतिशय सोपा वाटला. पाउस थांबला होता. ढग नाहिशी होउन सुर्याने आता स्रूष्टीचा ताबा मिळवला होता. मनात साठलेल्या सुखद, गार आठवणी घेउन आम्ही परतिचा प्रवास करत होतो.

मन उधाण वाऱ्याचे !

posted under by Rakesh Vende
आज खरं म्हणजे काही काम करायची इच्छाच् नव्हती. सकाळपासुन नेटींग चाललय. ह्याचे ब्लॉग वाच, त्याचे ट्विटर अपडेट्स चेक कर आणि बरेच काही. खरं तर बरीचशी कामं तात्काळत पडली आहेत, मनात अक्षरशः वादळ उठलय, भरपुर गोष्टी ज्या करावयाच्या राहून गेल्या होत्या त्या पुर्ण करायाची ओढ लागली आहे. आणि मी आपला मनमुराद वेळ वाया घालवतो आहे; असं उगाचच मनाला वाटून गेलं.

ज्या गोष्टी करण्यासाठी मन उतु जात आहे त्यात ‘वाचनाचा’ पहिला क्रमांक लागतो. आता वाचनातही बघा, मराठी पासुन ते इंग्रजी पुस्तके. अरे प्रोफेशनल बुक्स रिडिंग तर राहिलेच. महाजालावर मराठी अनुदिनींचे भन्नाट वाचन चाललय ते सांगायलाच नको :). आणि घरी गेल्यावर तो ‘टाईम्स-ऑफ-ईंडिया’ पेपराचा पुर्ण फडशा पाडायची इच्छा असते. काय झालं ते नेमकं सांगता येणार नाही, पण वाचन हे व्यसन कधी झाले काही कळलेच नाही. प्रत्येक गोष्टीत ‘का?’ हे शोधायची सवय लागली आहे. सभोवताली घडणाऱ्या असंख्य घटनांवर ‘चोहोबाजुंनी विचार’ करण्यात आपण कुठेतरी कमी पडत आहोत ह्या कल्पनेणेच मनाला कोरड पडते. ही तहाण भागवण्यासाठीच कदाचीत पुस्तकं हाती घेतली. असो, वाचनाबद्द्ल अजुन केव्हातरी लिहीन.

तर हया ‘Wish list’ चा हा पहिलाच ट्प्पा होता. याव्यतिरिक्त मी व्यायाम ( शरिरसौष्ठ्व,शरिरसंपादन ही म्हणु शकतात ;) ) याबद्दलही खुप पझेसिव्ह आहे. शकडो व्यायामशाळा तपासुन आलो, शेवटी घरीच व्यायाम करण्याचा निर्णयावर मन स्थिरावलय. ह्यात ‘मन स्थिरावलय’ हे विशेष ;)

बास्केट-बॉल खेळेणं हे तर अगदी प्राण प्रिय. वयाच्या दहाव्या वर्षापासुनच ह्या खेळाने वेड लावले होते ते आजतागायत तसेच आहे. बऱ्याच दिवसांपासुन पुणे-विद्यापिठाच्या परिसरात बास्केट-बॉल खेळत आहे. एक तर पुणे-विद्यापिठाचे वातावरणच अतिशय प्रसन्न आणि त्यात त्याठिकाणी खेळायला मिळणे म्हणजे भाग्यच म्हणायला हवे. लहानपणी लाल मातीच्या मैदानावर भर पावसात बास्केट-बॉल खेळतांना विलक्षण मजा येत असे.  म्हणूनच या वेळेस पावसाळ्याची वाट जरा जास्तच आतुरतेने बघत
आहे., भुतकाळातील त्या सुंदर क्षणांमध्ये परत भिजता येईल हा वि़चारच मनाला सुखद अनुभूती देवुन जातो.

ह्याशिवाय गाणी एकणे, विकेएंड्स्ला मनमुराद भटकणे, दररोज आई-बाबांशी फोन वर बोलणे, भरपुर झोपणे इ. हे आहेच.

खरं तर लहानपणी ह्यातल्या बऱ्याच गोष्टी आम्ही मनमुराद करत होतो. परंतु इजिनीयरींगला प्रवेश घेतल्यानंतर आयुष्य अतिशय एंकागी बनले. तेच लेकचर्स, पिएल्स, परिक्षा, सुट्ट्या ह्यात ते चार वर्ष कुठे निघुन गेलीत काही कळलच नाही. आणि इंजिनियरींग बद्दल बोलायचे म्हटले तर, आय. टी. शाखेतील अभ्यासक्रम आम्हाला व्यावसायिक जिवनात किती उपयोगी पडला हे सांगणे तितकेसे कठीण नाहीच ;) परंतु त्याच चार वर्षांनी आम्हाला "how to cope with pressure & simultaniously enjoy the life" ह्या काही महत्वाच्या गोष्टी शिकवल्या हे विशेष नमुद करावेसे वाटते.:)

बोलता बोलता मूळ मुद्द्यावरूनच भटकलॊ की आपण. विश-लीस्ट मधे एवढ्या साऱ्या गोष्टी असतांना, असा वेळ वाया घालवणं किती बरोबर आहे?

ह्यातल्या किती गोष्टी मी नियमीतपणे करतो, किंवा तसा करण्याचा प्रयत्न करतो? मनातल्या ह्या सर्व इच्छांना साध्य करण्यासाठी मी किती डिसिप्लीन्ड आहे? असेही बरेच प्रश्न मनात येवून जातात. खरं सागु मला काही साध्यच करायचं नाही. दिवसा अखेरीस मी अमुक पुस्तक वाचुन काढलं, एवढा व्यायाम केला, हे केलं,
ते केलं असं मला नक्कीच साध्य करायचं नाही किंबहुना ते सर्व शक्य नसेलही कदाचीत. परंतू मला मनात असलेल्या ह्या सर्व इच्छाची हौस भागवायची आहे. ही हौस भागवताना होणारा आनंद मला मिळवायचा आहे. मला खुप कामं आहेत तत्सम कारणं दाखवत मला ह्या इच्छांना मारायचे नाही. जेवढे शक्य होईल तेवढे, इच्छांपुर्ती करायच प्रयत्न करेनच, त्या साध्य झाल्याचे समाधान नक्कीच असेन, पण अपुर्णात्वाची खंतही मनात कधीच राहणार नाही, हे मात्र नक्की.


मला लिखाण करायला खुप आवडते,
परंतू प्रत्येक लिखाण पुर्णच झाले पाहिजे किंवा ते ब्लॉगरुपात छापुनच आलं पाहिजे असा हट्ट नक्कीच नसतो. खरा आनंद मला मिळतो तो लिखाणात, लिखाण करते वेळी सुचणाऱ्या सुंदर शब्दात, ते प्रत्येक वाक्य खोडुन काढण्यात जे काही क्षणापुर्वी सुंदर वाटत असले तरी आता पुर्णच लॉगिक लेस वाट्त होतं. आणि ह्यालाच काहीसे आयुष्य जगणे असे म्हणत असावेत.

खरं तर आयुष्यात साध्य करणे-साध्य न करता येणे असं काही नसतच मूळी. ‘आयुष्य जगणे’ हे असचं काहीतरी असतं, आणि ते आपण जगायलाच हवं.:)


 

I Twitter too !

posted under by Rakesh Vende

Well, I couldn't resist myself & I started twittering too :)

Technically speaking twitter offers you a service of micro-blogging. Good ! professionals understood it. For my friends, twitter says, it's all about letting people know "what r u doing?".

My basic idea of twitter

I was twittering in past too but in slightly different ways. It was by using internet messenger Google Talk where I used to share my day-to-day updates with a limit that Gtalk allowed me to put in that restricted text box. It was interesting to tell your friends that the book I read, movie I just saw & What a interesting 5km long walk we had last night at 10 pm, though we had a motor bike with us. :D

It was all there but till that it wasn't discovered & hadn't been named as micro-blogging.

Then, why to switch to twitter?

Well Google hadn't provided that feature with intent people were using it :) strange !!

Lo, they were not saving my precious updates (user community calls it status message, punch lines n much more.)

What am I going to do on Twitter?

I specifically elaborate this idea of 'What I do now?' with my needs as follow.

Simple, What do I do at this moment?, If it is interesting.

What I think at this moment?, again If it interesting.

What I am reading?, No matter if you feel it interesting & It applies to all below listed. ;)

Some classical quotes from books I read.

Some web URLs of interesting reading stuff.

And last but not least,

Some weird ideas from S/W development & S/W entrepreneurship :)

What impressed me as a developer?

My entrepreneurial mind couldn't stop myself from raising this question and I think its worth too.

Twitter stands upon very basic idea of micro-blogging with its fairly trivial implementation. That impressed me !

If I see as a user of networking sites, I had got pretty much bored of orkut by asking same questions to my friends as how r u? what r u doing? bye TC ;) I bet that these scraps must be more than half of the total scraps Google have collected in its database.

I will not ask you about yourself; I will tell you about myself is what the simple agenda twitter follows and that gives me a feeling of being interconnected.

Oh ! I'm getting late. Now I need to go to twit about this blog :)

माझे श्रध्दास्थान: डॉ.आंबेडकर

posted under , by Rakesh Vende

"भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर" यांची जयंती. त्यानिमित्त त्यांना मानपुर्वक अभिवादन.


माझे श्रध्दास्थान डॉ.आंबेडकर, माझ्या समाजबांधवाना आपल्या जिवनाचे उद्दिश्ट समजावून सांगताना खालील विचार मांडतात.


"आपले उद्दिश्ट काय आहे ते निट समजुन घ्या. शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिश्ट व आकांक्षा आहे, हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरुन ठेवा, म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहील की ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत, ज्यांच्यासाठी आम्ही लढत आहोत ते काही लहानसहान संकुचित ध्येय नाही. थोड्याशा नोकऱ्यांसाठी किंवा सवलतीसांठी आपला लढा नाही. आमच्या अतःकरणातील आकांक्षा फर मोठी आहे. शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिश्ट होय."

(वरील परिच्छेद "रावसाहेब कसबे" यांच्या "आंबेडकर आणि मार्क्स" या पुस्तकातून घेतला आहे.)क्रमशः

एक होता कार्व्हर

posted under by Rakesh Vende


वीणा गवाणकर यांचे 'एक होता कार्व्हर' हे पुस्तक वाचुन संपवले. मन एका विलक्षण अनुभुतीतून अगदी ढवळुन निघाले.

अनाथ
मुलगा, तत्कालीन समाजव्यवस्थेत दुय्यम समजल्या जाणाऱ्या समाजात जन्माला आलेला, ज्ञानार्जानासाठी निघतो. मार्ग खुप खडतर, वय पहावे तसे खेळण्या-बागडण्याचे, मार्गात अनेक मानवनिर्मित तसेच निसर्गनिर्मित डोंगराएवढ्या समस्या उभ्या ठाकलेल्या. सभोवताली आपल्या समाजबांधवांवर होणारे अत्याचार पाहुन खिन्न झालेले मन, अशाही बिकट परिस्थितित मनाचा तोल धासळू देता शिक्षण पुर्ण करण्याची जिद्द. तरीही तो अनाथ मुलगा स्व-बळावर आपले शिक्षण पुर्ण करतो.

पुढे हाच मुलगा..शेती शास्त्रात मोठ-मोठी संशोधन करतो..... अवघ्या दक्षिण अमेरिकेचा कायापालट होतो. मानव समाजाची सेवा हेच त्याचे ध्येय बनते. कुणाबद्द्ल मनात द्वेष नाही, सर्वासाठीच त्यांचे ज्ञानाचे दालन खुले असे. यशाच्या उंबरठ्यावर असताना सुद्धा त्यांना अपमानाची झळ सोसावी लागली.तरीही ह्या महामानावाला कुणाबद्दल कसलीही तक्रार नाही. आपले काम, आपली (मानव) समाज सेवा पुर्ण निष्ठेने करणे एवढाच काय त्याच जगण्याचामंत्र होवुन बसला होता. त्या महामानवाचे नाव होते "जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर", त्यांच्यावद्द्ल अधिक माहीती येथे वाचू शकतात.


ह्या पुस्तकातील खालील उतारा मला बरेच काही शिकवुन गेला !

"वर्णद्वेषाची तीव्र झळ सोसूनही त्यांनी आपल्या मुखावाटॆ कटू शब्द बाहेर पडू दिले नाहीत. माझ्या तोंडावर पाणी फेकून 'हा पाऊस आहे!' असं ते भासवू शकत बाहीत. मी द्वेष करावा ईतक्या खालच्या पातळीवर मला कोणी खेचू शकत नाही...माझ्यवर अनेक अन्याय झाले. पण प्रत्येक वेळी अन्यायाचं निराकरण करुन घेण्यासाठी मी माझी शक्ती, बुध्दी पणाला लावली असती तर माझं जीवितकार्य तडीस नेण्यासाठी माझ्याकडे शक्तीच उरली नसती"
अप्रतीम पुस्तक ! नक्की वाचा.

top